मत्स्य शेततलाव व तलाव‌

तलावाच्या साईज प्रमाणे बीज सोडणे

पाँलिथीन मत्स्य शेततलाव व तलाव‌

 • पाँलिथीन शेततळे : पाँलिथिन शेततलावात मत्स्यबीज सोडण्यापुर्वी ३ फुट अंतरावर नायलाँन दोरी लावणे ही कड ते ती कड बांधुन घेणे.
 • फायदे: पाणकोंबडी हा प‌क्षी मासे खाण्यासाठी दोरीच्या भिती पोटी येत नाही.
 • शेततळ्यात कोणते मासे सोडावेत : पाँलिथीन शेततळ्यात रोहु,कटला,मुरगळ,सुपरनेस कोंबडा इ.
 • रोहु : हा मासा मधल्या थरात राहतो
 • कटला: हा मासा वरच्या थरात राहतो.
 • मुरगळ : हा मासा सर्व थरात राहतो.
 • सायप्रिनिस(कोंबडा): हा मासा खालच्या थरात राहतो व मातीमिश्रीत अन्न खातो.
 • शेततळ्यात मासे सोडल्यानंतर : तळ्यात मासे सोडल्यानंतर २ दिवस काहीही खाद्य टाकायचे नाही व दोन दिवसांनी २ किलो शेंगदाणा पेंड व बळे फिश खाद्य सायंकाळी भिजवुन दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान च्या दरम्यान टाकावी व ती सलग १० दिवस टाकावी.
 • खाद्य: १० दिवसानंतर १ किलो तांदुळ व १ किलो बाजरी भरडुन बळे फीश खाद्य टाँनिक १० मिली असे मिश्रण करुन रोज संध्याकाळी भिजवत घालणे व सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान टाकावी. कमीत कमी ३ महिने टाकावे
 • १ महिन्यानंतर : फक्त तांदुळ व बाजरी भरडुन टाकणे
 • दुसऱ्या महिन्यानंतर : गव्हाचा कोंडा २ किलो व बळे फिश टाँनिक या प्रमाणे भिजवुन टाकावे व माशाच्या साईज (वाढीप्रमाणे) खाद्य टाकावे
 • तलावात आँक्सिजन कमी पडु नये म्हणुन : तलावात जेवढे उंचावरुन पाणी टाकता येईल तेवढे टाकावे कारण आँक्सिजन तयार होतो(हवेच्या बुडबुड्यामुळे)
 • पाणी: रोज कमीत कमी १ तास पाणी टाकावॆ
 • पाण्यात मोटार किंवा फुटबाँल असेल तर: त्यावर मच्छरदाणी लावावी.
 • शेततलावात जर मासे मरत असतील तर: आँक्सिजन तयार होण्यासाठी पाणी उंचावरुन टाकावे माशांना इजा किंवा जखम झाल्यास किंवा मरण पावल्यास २०० ग्रँम पोटँशियम टाकावे
 • मासे दिड ते दोन इंच झाल्यास : माशांना तांदुळ व बाजरी भाजुन भरडुन व बळे फिश रात्री भिजवणे व सकाळी ८ ते ९ वा. टाकणे.
 • टिप: रोज सकाळी ८ ते ९ या दरम्यान खाद्य टाकणे. माशांना योग्य असते. मासा खाद्यासाठी फिरला तरच त्याची वाढ योग्य होते. म्हणुन जास्त खाद्य टाकु नये