गुणवत्तेचे
व्यवस्थापन
पाण्याच्या गुणवत्तेवर माशांचे स्वास्थ्य व वाढ अवलंबुन असते. पाण्याची गुणवत्ता उत्तम राखता आल्यास भरघोस मत्स्योत्पादन मिळणे शक्य होईल. मत्स्यशेतीमध्ये पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन अत्यंत महत्वाचे आहे. माशांचे वाढीसाठी आवश्यक घटकाची पाण्यातील पातळी कायम राखणे व अपायकारक घटकांची पाण्यातील पातळी किमान ठेवणे यास पाण्याच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन म्हणता येईल. पाण्याची गुणवत्ता पाण्यातील जीव जंतुच्या विष्ठेमुळेच अतिरिक्त मशागत व खाद्यामुळे खराब होते. पाण्यातील विद्राव्य प्राणवायु,अमोनिया,आम्लता,निर्दॆशांक,तापमान,दृश्यता,रंग, खोली,नायट्रेट, नायट्राईट,वनस्पती घनता इ. हे महत्वाचे घटक असुन त्यांची पातळी नियंत्रणात असणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे पाण्याच्या गुणवत्तेचे निकष पुढीलप्रमाणे
- तापमान : २८ ते ३२ से.ग्रेड
- विद्राव्य प्राणवायु : ५ ते ७ पि.पी.एम.
- जीवनशास्त्रीय प्राणवायुची गरज : ३० पि.पि.एम.
- कर्बाव्दिल प्राणवायु : २० पि.पि.एम. पेक्षा कमी
- पारदर्शकता : ४० सें.मी.
- रंग : तपकिरि किंवा फिकट हिरवा
- प्राणीप्लवंग : १० २० एम.एल/१०० लिटर्स
- आम्लता निर्देशांक : ७ ते ८.५
- एकुण क्षारता : ५०० ते १००
- कठिणपणा : ७० ते १५० पि.पि.एम. पेक्षा कमी
- अमोनिया : १५ पि.पि.एम. पेक्षा कमी
- नायट्राईड : १ पि.पि.एम. पेक्षा कमी
- नायट्रेड : २० पि.पि.एम. पेक्षा कमी